गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक इंटरनेट वर माहिती मिळवण्यासाठी गुगल चा वापर करतात. एवढे प्रचंड वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिन ला ब्लॉग किंवा वेबसाईट जोडावीच लागते. भारतातल्या सर्व वेबसाईट चा मुख्य ट्रॅफिक श्रोत गुगल आहे.
ब्लॉग गुगल वर जोडण्याचे महत्वाचे फायदा असा की जेंव्हावर काही सर्च करेल तेंव्हा गुगल विविध ब्लॉगच्या पोस्ट दाखवते. त्या पोस्ट ला एका क्रमाने दाखवले जाते. ज्या पोस्ट चा सर्वात चांगला SEO आहे ती पोस्ट गुगल च्या पहिल्या स्थानावर असते. गुगलवरल्या सर्व ब्लॉग आणि वेबसाईट गुगल वर जोडण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी गुगल चे एक टूल आहे ज्याला गुगल सर्च कंसोल किंवा गुगल वेबमास्टर किंवा गुगल सर्च सेंट्रल असे म्हणतात.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण गुगल सर्च कंसोल बद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर गुगल सर्च इंजिन ला ब्लॉग किंवा वेबसाईट कशी जोडायची हे पाहणार आहोत. ब्लॉग जोडल्यावर सर्च कंसोल कसे वापरायचे हे पाहू आणि शेवटी गुगल सर्च कंसोल चे ब्लॉग किंवा वेबसाईट च्या मालकाला काय फायदे होतात यावर नजर मारू. तर चला वेळ न लावता सुरू करूयात.
अनुक्रमणिका
गुगल सर्च कंसोल काय आहे? (What is Google Search Console in Marathi)
गुगल सर्च कंसोल हे टूल गुगल वर जोडल्या जाणाऱ्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला नियंत्रित करण्याचे साधन आहे. वेबसाईट च्या मालकाला कोणत्या URL मध्ये काय चुका आहेत, क्रोलिंग च्या चुका, आणि अजून बरीच माहिती या टूल द्वारे मिळते. गुगल वेबमास्टर हे टूल संपूर्णपणे फुकट आहे. कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकते.
गुगल सर्च इंजिन द्वारे वेबसाईट वर किती क्लिक आल्या, कोणत्या देशातून, कोणत्या वेळेस आल्या ही सर्व गुगल सर्च कंसोल दाखवते. याबरोबरच गुगल वर ब्लॉग किती वेळा पहिला गेला हे सुद्धा कळते. जर तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट गुगल वेबमास्टर ला जोडलेली नसेल तर ती गुगल वर दाखवली जात नाही. आता आपण पाहू की गुगल सर्च कंसोल कसे वापरावे.
गुगल सर्च कंसोल कसे वापरावे?
गुगल सर्च कंसोल ब्लॉग किंवा वेबसाईट साठी कसे वापरता येईल हे आपण पाहू. यात ब्लॉग गुगल वेबमास्टर ला जोडणे, साईटमॅप सबमिट करणे, ह्या महत्वाच्या प्रक्रिया आहेत या सर्व कशा करायच्या त्याबद्दल आपण माहिती घेऊ.
गुगल सर्च कंसोल वर ब्लॉग कसा जोडायचा-
गुगल सर्च कंसोल ला ब्लॉग जोडण्यासाठी सर्वात आधी गुगल सर्च कंसोल या वेबसाईटवर जा. तुमच्यासमोर खालीलप्रमाणे पेज उगढेल.
आता "Start now" या बटन वर क्लिक करा आणि पुढे तुमचा ई-मेल आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
आता समोर Select property type असा एक बॉक्स दिसेल त्यात "URL prefix" मध्ये जाऊन दिलेल्या जागी तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट ची URL टाकून "CONTINUE" बटन वर क्लिक करा.
तुमचा ब्लॉग जर ब्लॉगर वर असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायची गरज नाही ते आपोआप वेरीफाय होते, पण जर ब्लॉग वर्डप्रेस मध्ये असेल तर तुम्हाला वेरीफाय करण्यासाठी काही स्टेप्स कराव्या लागतात. यासाठी HTML tag ही पद्धत सोपी आहे. ब्लॉगच्या HTML कोड च्या <head> मध्ये <body> येण्याच्या आधी दिलेला कोड पेस्ट करायचा आहे आणि DONE वर क्लिक करायचे आहे. ब्लॉगचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.
अभिनंदन आता तुमची साईट गुगल सर्च इंजिन ला जोडली गेली आहे.
साईट गुगल ला जोडली आहे पण गुगल ला कळले पाहिजे की तुमच्या ब्लॉगवर पोस्ट आहेत, पेजेस आहेत ते तुम्हाला इंडेक्स करायचे आहेत, त्यासाठी साईटमॅप सबमिट करावा लागतो. ते आपण खाली पाहुयात.
गुगल सर्च कंसोल वर साइटमॅप सबमिट कसा करायचा-
साईटमॅप सबमिट करायच्या आधी आपल्याला माहीत असले पाहिजे की साईटमॅप काय असतो. तर चला आधी पाहुयात की साईटमॅप काय असतात.
साईटमॅप हा ब्लॉग किंवा वेबसाईटचा एक नकाशा असतो ज्याच्या मदतीने सर्च इंजिनला साईट शोधायला, क्रॉल करायला, आणि इंडेक्स करायला मदत होते. साईटमॅपमुळे सर्च इंजिन ला कळते की साईट चे कोणते पेजेस महत्वाचे आहेत आणि त्यानुसार सर्च इंजिन पेजेस आणि पोस्ट इंडेक्स करते. तर चला साईटमॅप सबमिट कसा करायचा.
साईटमॅप सबमिट करायची प्रक्रिया-
ब्लॉगर च्या मेनू मधून "Settings" वर जा.
खाली स्क्रोल करा आणि फोटो मध्ये जे आहे ते शोधा.
Enable custom robot.txt हे ON करा. (फोटो प्रमाणे) आणि Custom robots.txt मध्ये खालील कोड कॉपी करून पेस्ट करा.
-कोड सुरू-
User-agent: *
Disallow: /search
Allow: /
Sitemap:
https://www.mahamahiti.in/atom.xml? redirect=false&start-index=1&max-results=500
-कोड समाप्त-
आता गुगल सर्च कंसोल उघडा आणि मेनू मधल्या Sitemaps या पर्यायावर क्लिक करा.
आता दिलेल्या जागेवर खालील URL टाकायची आहे.
<<<< atom.xml? redirect=false&start-index=1&max-results=500 >>>>
यात माझ्या ब्लॉग लिंक ऐवजी तुमची लिंक टाका आणि "SUBMIT" वर क्लिक करा.
Status मध्ये Success आले तर साईटमॅप यशस्वीपणे सबमिट झाला आहे आणि आणि आले तर थोडा वेळ थांबा. काही वेळेस Success येण्यास वेळ लागतो.
Comments
Post a Comment