What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
तुम्ही पाहता प्रत्येक कंपनी ला एक स्वतः चा लोगो असतो, त्या लोगोवरून त्या कंपनी ची ओळख पटत असते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक वेबसाईट आणि ब्लॉग ला एक लोगो असतो. वेबसाईट किंवा ब्लॉगच्या लोगो ला फेविकॉन असे म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण या फेविकॉन बद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कि Favicon म्हणजे काय?, Favicon कसे तयार करतात?, ब्लॉगर आणि वर्डप्रेस ब्लॉगला फेविकॉन कसा जोडायचा? आणि फेविकॉन लावल्याचे साईट ला काय फायदे होतात हे सुद्धा पाहणार आहोत. (What is Favicon in Marathi) तर चला वेळ न लावता सुरु करूयात.
अनुक्रमणिका
- फेविकॉन म्हणजे काय? (What is Favicon in Marathi?)
- ब्लॉगला फेविकॉन लावल्याचे फायदे (Benefits of Favicon in Marathi)
- फेविकॉन कसा तयार करायचा? (How to Create Favicon in Marathi?)
- ब्लॉगर ब्लॉगला फेविकॉन कसा जोडायचा? (Adding Favicon in Blogger Blog Marathi)
- वर्डप्रेस ब्लॉगला फेविकॉन कसा जोडायचा? (Adding Favicon in WordPress Blog Marathi)
- निष्कर्ष
फेविकॉन म्हणजे काय आहे? (What is Favicon in Marathi?)
फेविकॉन म्हणजे एक छोटा साईट आयकॉन होय. ब्राउजर विंडो मध्ये जेंव्हा आपण एखादी साईट उगढतो तेव्हा वेबसाईट च्या लिंक च्या डाव्या बाजूला एक आयकॉन दिसते त्याला फेव्हिकॉन असे म्हणतात. फेविकॉन मुळे साईट ची ओळख पटत असते. फेविकॉन चा आकार चौरसाकृती असावा लागतो.
फेविकॉन हा ब्रँडींग चे काम करतो. जसे आपण एखाद्या कंपनी ला तिच्या लोगोवरून ओळखतो, त्याचप्रमाणे फेविकॉन साईट ची एक ओळख बनतो. ब्लॉग किंवा साईट ला फेविकॉन लावल्याचे काय फायदे होतात हे आपण खाली पाहू. व्यावसायिक वेबसाईट साठी फेविकॉन खूप प्रभावशाली ठरतात, यामुळे ग्राहकांचा वेबसाईटवर विश्वास वाढतो.
ब्लॉगला Favicon लावल्याचे फायदे-
१) फेविकॉन हा साईट ची एक वेगळी ओळख निर्माण करतो.
२) ब्लॉगला फेविकॉन लावल्याने साईट वापरकर्त्यांना एक वेगळा अनुभव मिळतो.
३) ब्राउजर विंडो मध्ये खूप टॅब उगडलेले असतात, तेव्हा ब्लॉगची URL दिसत नाही फक्त फेविकॉन दिसते. त्यामुळे वापरकर्त्याला आपला ब्लॉग ओळखायला मदत होते.
४) जेव्हा कोणी तुमच्या ब्लॉगला शॉर्टकट म्हणून होम स्क्रीन वर जोडते तेव्हा फेविकॉन हे एप आयकॉन म्हणून काम करते.
ब्लॉगला फेविकॉन लावल्याचे हे प्रमुख फायदे होतात.
फेविकॉन कसा तयार करायचा?
फेविकॉन काय आहे आणि फेविकॉन चे फायदे आपण पहिले आता पाहू कि फेविकॉन कसे बनवायचे.
फेविकॉन बनवणे अतिशय सोपे आहे. फेविकॉन बनवून देणारे सॉफ्टवेअर इंटरनेट वर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. फेविकॉन जनरेटर हे सुद्धा चांगले सॉफ्टवेअर आहे. यावर तुम्हाला साईट लोगो अपलोड करायचा आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला त्याचा फेविकॉन मध्ये रूपांतर करून देईल. खाली फेविकॉन बनवण्यासाठी उपयुक्त अश्या सॉफ्टवेअर ची नवे देत आहे-
- Adobe Photoshop
- Gimp
- Canva (मोबाईल एप)
फेविकॉन चा एक ठराविक आकार, स्वरूप असते. ब्लॉगर आणि वर्डप्रेस या दोन्ही प्लॅटफॉर्म साठी जरा वेगळे स्वरूप आहे ते खालील प्रमाणे-
ब्लॉगर-
आपण जर ब्लॉगर प्लॅटफॉर्म वापरत असाल तर यासाठी फेविकॉन ची साईज १००kb पेक्षा कमी असली पाहिजे आणि आयकॉन १:१ मध्ये म्हणजेच चौरस असला पाहिजे.
वर्डप्रेस-
वर्डप्रेस साठी साईझ ची काहीही अट नाही. पण आयकॉन ची उंची आणि रुंदी दोन्हीही ५१२ पिक्सेल असली पाहिजे. वर्डप्रेस मध्ये आयताकृती प्रतिमा टाकली तरी चालते कारण यात प्रतिमेला एडिट करता येते. इमेज ला आकार देण्याची सुविधा वर्डप्रेस मध्ये देण्यात आलेली आहे.
ब्लॉगर ब्लॉगला फेविकॉन कसा जोडायचा?
१) तुमच्या ब्लॉगर अकाउंट वर लॉगिन करा.
२) "Settings" वर क्लिक करा.
३) आता "Favicon" वर क्लिक करा.
४) "Choose file" वर क्लिक करून फेविकॉन अपलोड करा.
वर्डप्रेस ब्लॉगला फेविकॉन कसा जोडायचा?
१) तुमच्या वर्डप्रेस अकाऊंट वर लॉगिन करा.
२) मेनू मधून "Design" विभागातून "Customize" पर्यायावर क्लिक करा.
३) "Site Identity" वर क्लिक करा.
४) आता "Select site icon" वर क्लिक करा.
५) तुमचा फेविकॉन येथे अपलोड करा.
६) सर्व पर्याय पूर्ण करून "Save" करा. आता तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगला फेविकॉन जोडला गेला आहे.
निष्कर्ष-
या पोस्टमध्ये मी फेविकॉन बद्दल संपूर्ण माहिती (Favicon in Marathi) सांगितलेली आहे. तरी जर तुम्हाला पोस्टसंबंधी काही अडचण असेल तर मला कॉमेंट द्वारे कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.
महत्वाची माहिती दिली...
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete