सर्च इंजिन काय असते? (What is Search Engine in Marathi?) हा प्रश्न इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडत असेल कारण आज इंटरनेट ची सुरुवातच सर्च इंजिन पासून होते.
आजचे 21वे शतक हे इंटरनेट चे युग आहे. आज जवळपास सर्वच लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि त्यात इंटरनेट आहे. आजच्या काळात जर कोणाच्या मनात जर काही प्रश्न असेल किंवा कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तो लगेच आपला मोबाईल काढतो आणि इंटरनेट वर सर्च करून माहिती काही सेकंदात मिळवतो. शिक्षकांना किंवा जवळच्या व्यक्तींना नाही विचारत बसत.
असा कोणताही प्रश्न नाही ज्याचे उत्तर इंटरनेट नाही देऊ शकत पण पूर्वीच्या काळी जेंव्हा इंटरनेट नव्हते तेंव्हा असे नव्हते. इंटरनेट वर करोडो वेबसाईट आहेत. प्रत्येक वेबसाईट कोणत्या न कोणत्या विषयावर माहिती देत असते. पण तुम्ही विचार केला आहे का एवढ्या इंटरनेट वर एवढ्या करोडो वेबसाईट आहेत तर यांचे नियोजन कोण करते, आपल्या प्रश्नावर बरोबर उत्तर कोण शोधून आपल्याला देते? नाही ना! याला सर्च इंजिन म्हणतात.
आजच्या या पोस्टमध्ये आपण सर्च इंजिन म्हणजेच शोध इंजिन बद्दल माहिती घेणार आहोत. यात आपण पाहू की सर्च इंजिन म्हणजे काय, सर्च इंजिन कसे कार्य करते आणि यासोबतच काही लोकप्रिय सर्च इंजिन बद्दल माहितीसुद्धा घेऊ. तर त्यासाठी पोस्टला संपूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
- सर्च इंजिन म्हणजे काय? (What is a Search Engine in Marathi?)
- जगातील काही लोकप्रिय सर्च इंजिन- (Popular Search Engines in World)
- भारतीय सर्च इंजिनची नावे- (Indian Search Engine Names)
- सर्च इंजिनचा इतिहास- (History of Search Engine in Marathi)
- सर्च इंजिन कसे कार्य करते? (How search engine works in Marathi)
- निष्कर्ष
सर्च इंजिन म्हणजे काय आणि हे कसे कार्य करते - संपूर्ण माहिती
सर्च इंजिन एक सॉफ्टवेअर आहे. इंटरनेट च्या असिमीत माहिती च्या साठ्यातून योग्य माहिती निवडून उपभोगत्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्च इंजिन करते. गुगल हे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. याखालोखाल याहू, बिंग असे काही सर्च इंजिन आहेत.
सर्च इंजिनला समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की मला सर्च इंजिन बद्दल माहिती हवी आहे आणि मी सर्च केले "सर्च इंजिन म्हणजे काय" आणि मी सर्च वर क्लिक केले. आता सर्च इंजिन चे काम सुरू होते. हे जगभरातल्या सर्व साईट स्कॅन करते आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधते आणि ज्या वेबसाईट मध्ये उत्तर आहे त्या आपल्याला दर्शवते.
जर माझ्या प्रश्नाचे उत्तर खूप साईट मध्ये आहे तर सर्च इंजिन ठराविक वेबसाईटला पहिल्या पेजवर का ठेवते? याचे कारण असते Search Engine Optimization. त्यानुसार साईट चा क्रम ठरवला जातो. आता तुम्हाला समजले असेल की सर्च इंजिन किती महत्वाची भूमिका निभावतो.
जगातील काही लोकप्रिय सर्च इंजिन- (Popular Search Engines in World)
पूर्वीच्या काळी खूप सर्च इंजिनचा निर्माण केला गेला होता त्यातील काहीच आत्ता चालू आहेत तर काही बंद पडले आहेत. तर आता आपण जगातील काही लोकप्रिय सर्च इंजिन पाहू.
1) Google
2) Bing
3) Yahoo
4) Ask.com
5) AOL.com
भारतीय सर्च इंजिनची नावे- (Indian Search Engine Names)
1) 123Khoj
2) Epic Search
3) Bhanvad
4) GISAXS
5) Guruji
Also read: TOP 10 SEARCH ENGINES
सर्च इंजिनचा इतिहास- (History of Search Engine in Marathi)
इंटरनेट चा शोध 1960 मध्ये लागला. इंटरनेट वर विविध वेबसाईट यायला लागल्या पण याचा वापर सर्वसामान्य व्यक्तीला करता यावा यासाठी सर्च इंजिन चा शोध लावला गेला. 1990 च्या आधी इंटरनेट वर माहिती शोधणे शक्य नव्हते कारण सर्च इंजिन चा शोध लागलेला नव्हता.
McGill University च्या एका शाळेच्या उपक्रमातुन पहिले सर्च इंजिन तयार झाले. McGill University चे एक विद्यार्थी Alan Emtage यांनी हे सर्च इंजिन बनवले.
Archie हे जगातील पहिले सर्च इंजिन आहे. याचा निर्माण 1990 मध्ये केला गेला होता. Indexing साठी बनवले गेलेल्या या सर्च इंजिन चे कार्य ऑनलाइन FTP Document ला ऑनलाईन उपलब्ध करून देणे होते. यानंतर खूप सर्च इंजिन बनवले गेले.
आज जे गुगल जगात सर्वात जास्त वापरले जाते त्याचा शोध 1995 मध्ये लागला. Stanford University, California मध्ये शिकत असलेल्या दोन PHD च्या विद्यार्थ्यांनी गुगल तयार केलेले. या दोन विद्यार्थ्यांचे नाव Sergery Brin आणि Larry Page असे आहे.
सर्च इंजिन कसे कार्य करते? (How search engine works in Marathi)
तुम्हाला सर्च इंजिन म्हणजे काय आहे हे समजले आहे. आता आपण पाहू की सर्च इंजिन कार्य कसे करते. वरील माहिती वाचून तुम्हाला कळले असेल की आपण जेंव्हा सर्च इंजिन वर काही सर्च करतो तेंव्हा सर्च इंजिन सर्व वेबसाईट सर्च करून त्यातून आपल्याला माहिती मिळून देतो, हे झाले सध्या भाषेत. आता आपण तांत्रिक दृष्टीने सर्च इंजिन कसे कार्य करते हे पाहू.
सर्च इंजिन वर कीवर्ड सर्च केल्यापासून ते माहिती मिळेपर्यंत हे कार्य तीन टप्प्यात होते. सगळ्यात पहिले Crawling ची प्रक्रिया होते नंतर Indexing आणि शेवटी Ranking and Retrievel हे तीन टप्पे आहेत. चला याबद्दल माहिती घेऊ.
1) Crawling-
Crawling म्हणजे शोधणे, या प्रक्रियेत सर्च इंजिन नवीन जुन्या अश्या सर्व वेबसाईट स्कॅन करते. हे करण्यासाठी रोबोट ची मदत घेतली जाते यांना Crawler किंवा spider असे सुद्धा म्हणतात. यांचे काम असते की सर्व वेबसाईटला लिंक द्वारे जोडणे, वेबसाईट ला स्कॅन करणे आणि त्यांची माहिती एकत्र करणे.
हे spiders वेबसाईटमधील शीर्षक, प्रतिमा, कीवर्ड यांना स्कॅन करतात आणि यावरून ही वेबसाईट कोणत्या विषयावर आहे याचा शोध घेतात. Crawlers हे एका सेकंदात हजारो वेब पेज स्कॅन करू शकतात. आता crawling चे काम संपते, पुढे येते indexing.
2) Indexing-
Crawling रोबोट ने स्कॅन केलेली सर्व माहिती एका डाटाबेस मध्ये साठवण्याचे काम या प्रक्रियेत केले जाते. या डाटाबेस मध्ये सर्वर ठेवलेले असतात, हे सर्वर crawl केलेल्या सर्व वेब पेजेसला कॉपी करून साठवून ठेवतात. वेब पेजेस च्या या साठ्याला index असे म्हणतात.
आपण सर्च केल्यावर जी माहिती दर्शवली जाते ती हीच असते. यात सर्व वेबसाईट च्या लिंक ला एका यादी च्या स्वरूपात मांडले जाते. पण या यादीचा क्रम कसा ठरवतात यासाठी पुढली प्रक्रिया आहे जिला Ranking and Retrieval असे म्हणतात.
Comments
Post a Comment