Blogger. com हे एक फ्री ब्लॉग पब्लिशिंग सुविधा आहे. ही सुविधा गुगल च्या मालकीची आहे आणि यात वेबसाईट किंवा ब्लॉगला सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी काही थीम फुकट मध्ये दिलेल्या आहेत. वेबसाईट वर ब्लॉग असेल तर या थीमची खास गरज पडते कारण वेबसाईट स्वतः डिजाईन करायची असल्यास कोडींग करावी लागते जेणेकरून काम अवघड होते.
ब्लॉगरमध्ये काही थीम टेम्प्लेट आधीच दिलेले आहेत पण यात सर्व सोयी दिलेल्या नाहीत त्यामुळे कस्टम थीम ची गरज पडते. आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्लॉगर ब्लॉगला कस्टम थीम जोडण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. इंटरनेटवर हजारोंच्या संख्येत वेबसाईट आहेत ज्या कस्टम थीम विकतात किंवा काही मोफतसुद्धा देतात यांची मी खाली नावे देत आहे. ब्लॉगर वर देण्यात आलेल्या थीम टेम्प्लेट च्या तुलनेत कस्टम थीम सुंदर आणि SEO फ्रेंडली असतात.
ब्लॉगर ब्लॉगला कस्टम थीम जोडणे खूप सोपे आहे. कस्टम थीम जोडण्याची प्रक्रिया मोबाईलमध्ये पण करता येते. खाली मी ही प्रक्रिया पूर्णपणे समजावून सांगितलेली आहे त्यामुळे पोस्टला पूर्ण वाचा.
ब्लॉगरमध्ये कस्टम थीम टेम्प्लेट कसे जोडावे - महा माहिती
मी वरती आधीच सांगितले आहे की ही प्रक्रिया खूप सोपी आहे. खाली मी सर्व प्रक्रिया समजावून सांगत आहे.
१) ब्लॉगर टेम्प्लेट देणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन टेम्प्लेट डाउनलोड करा. डाउनलोड करताना टेम्प्लेट ब्लॉगरसाठीच आहे याची खात्री करा कारण वर्डप्रेस चे थीम ब्लॉगर वर चालत नाही.
२) डाउनलोड केलेले थीम टेम्प्लेट zip file च्या स्वरूपात असते. या file ला unzip करून घ्या.
३) आता तुमच्या ब्लॉगर अकाउंट वर लॉगिन करा आणि ज्या ब्लॉगला थीम जोडयची आहे त्या ब्लॉगच्या डॅश बोर्ड वरील Theme पर्यायावर क्लिक करा.
४) तेथे CUSTOMIZE समोरील बटनवर क्लिक करा आणि त्यातील Restore पर्यायावर क्लिक करा.
५) पुढे आता तुम्हाला थीम अपलोड करायची आहे. आता तुम्ही unzip केलेल्या फाईलच्या फोल्डर मधून .xml ने शेवट होणारी फाईल येथे अपलोड करा.
६) आता तुमच्या ब्लॉगला कस्टम थीम जोडली गेली आहे. नवीन थीम कशी दिसते हे पाहण्यासाठी View Blog वर क्लिक करा.
निष्कर्ष-
ब्लॉगरवर कस्टम थीम कशी जोडायची हे तुम्हाला समजले असेल. थीम जोडताना काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून नक्की विचारा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
Comments
Post a Comment